मुंबई, दादासाहेब येंधे : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभर स्वच्छता अभियान राबवले जाते. कोरोना अजूनही संपलेला नसल्यामुळे स्वच्छतेला आणि निर्जंतुकीकरणालाही महत्त्व दिले जात आहे. दीड वर्षापासून कोरोना (covid-19) मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे महात्मा गांधी यांचा वेश परिधान करून एका आरोग्य दूताने मुंबईतील शाळेत वर्गांमध्ये अशा प्रकारे फवारणी करून परिसर निर्जंतुक केला.

0 टिप्पण्या