मुंबई : शैक्षणिक शुल्कमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने शुक्रवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला. संपामुळे पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयातील ओपीडी सेवा काही ठिकाणी खंडित झाल्या तर केईएम सारख्या पालिका रुग्णालयांमध्ये वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्ण सेवा बजावली.
करोना तसेच करोना नसलेल्या अतिदक्षता विभागात, अपघात विभागातील रुग्णसेवा खंडित न करता ५५०० निवासी डॉक्टर या बेमुदत संपामध्ये सहभागी झाले होते. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. नायर रुग्णालयातील ३० टक्के निवासी डॉक्टर संपावर सहभागी होते.

0 टिप्पण्या