सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे विनापालक अल्पवयीन पळून आलेली मुलगी पोलिसांच्या जाळ्यात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे विनापालक अल्पवयीन पळून आलेली मुलगी पोलिसांच्या जाळ्यात

आधारकार्ड वरील फोटोवरुन हजारो रेल्वे प्रवाशांच्या गर्दीत रात्रीच्या वेळेस डब्यात शिरून मुलीला शोधून काढले

युट्युब सिंगर बनण्यासाठी सोडले घर

मुंबई, दादासाहेब येंधे : सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे यांस दिनांक १४/०९/२०२१ रोजी नियंत्रण कक्ष, वाडीबंदर येथून मेसेज प्राप्त झाला की, एक अल्पवयीन मुलगी कु. काजल यादव, वय १४ वर्षे, रा.ठि. भोपाळ ही घरातून कोणासही काहीएक न सांगता पळून गेलेली असून तिच्या मोबाईलच्या लोकेशननुसार ती पुष्पक एक्सप्रेसमध्ये आहे व मुंबईच्या दिशेने आहे. सदरचा संदेश प्राप्त होताच मा. श्री केसर खालिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या सुचनांप्रमाणे व मा. श्री एम. एम. मकानदार, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार व.पो.नि. श्री प्रविण भगत व पोलीस निरीक्षक श्री. भगवान डांगे यांनी लागलीच सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे रात्रपाळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस उप निरीक्षक श्रीमती. ज्योती मदकट्टे पोलीस उप निरीक्षक श्री. अर्जुन सांगळे यांना संपर्क साधून सदर घटनेचे गांभीर्य समजावून सांगून सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या अप पुष्पक गाडीची कसुन तपासणी करुन सदर अल्पवयीन मुलीचा प्राप्त आधारकार्ड वरील फोटोवरुन सर्वतोपरी शोध घेणेबाबत सुचना दिल्या.


त्यानुसार पोउनि. ज्योती मदकट्टे व अर्जुन सांगळे यांनी सदर मुलीचा फोटो कर्तव्यावरील सर्व पोलीस अंमलदार यांच्या व्हॉटस्अपवर पाठविला व सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे आगमन करणाऱ्या अप पुष्पक एक्सप्रेसचे गुगलद्वारे लोकेशन घेतले व ती ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे याची माहिती घेवून त्यानुसार ट्रेन प्लॅटफॉर्म क्र. १५ वर येणार असलेबाबत माहिती मिळताच प्रत्येक डब्यासमोर ०१ पोलीस अंमलदार अशी व्युहरचना बनवून नेमून दिलेल्या डब्यातील प्रत्येक प्रवाशी व मुले यांचे मास्क काढून त्यांना तपासणेवाबत तसेच डब्यातील प्रत्येक बर्थ व बाथरुम्स तपासणेबाबत पोलीस अंमलदारांना सुचना  दिल्या. सदर ट्रेनचे सुमारे २२.४५ वा. सीएसएमटी मेनलाईन रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. १५ येथे आगमन होताच ठरवून दिल्याप्रमाणे पोनि श्रीमती. ज्योती मदकट्टे, श्री. अर्जुन सांगळे, व पोलीस पथकाने सदर अप पुष्पक एक्सप्रेसमधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची कसुन तपासणी सुरु केली. तद्नंतर बोगीमध्ये जावून आतील बर्थच्या खाली व बाथरुममध्ये कोणी राहीले आहे का योबाबत शोध सुरु केला.

 

दरम्यान एक अल्पवयीन मुलगी एकटीच रेल्वे प्रवाशांच्या गर्दीमध्ये लपत छपत जात असताना सदर पथकातील सपोफौ. भागोरथ बाघ यांना दिसून आल्याने त्यांनी लागलीच पोउनि. श्रीमती. मदकट्टे यांच्यासह सदर मुलीस ताब्यात घेवून तिच्या चेहऱ्यावरील मास्क काढून पाहीले असता प्राप्त आधारकार्डवरील मुलीचे फोटोमध्ये व सदर मुलीच्या चेहऱ्यामध्ये साम्य दिसून आल्याने पोऊनि. श्रीमती मदकडट्टे यांनी सदर मुलीस ताब्यात घेवून तिचे नावपत्ता विचारता तिने-तिचे नाव कु. काजल राजेंद्र यादव, वय १४ वर्षे, रा.ठि. भोपाळ असे असल्याचे सांगितले. तेव्हा सदरची मुलगी ही तिच मिसिंग मुलगी असल्याची खात्री पटल्यावर पोउनि. श्रोमती. मदकट्टे यांनी सदर मुलीस विश्वासात घेवून तिच्याकडे विचारपुस करता तिने सांगितले की, तीला सिंगर बनायचे आहे, परंतू तिचे वडील तिला मोकळीक देत नव्हते. म्हणून तिने घरी कोणासही काहीही न कळविता मुंबईला पळून आली असल्याचे तिने कळविले. तेव्हा सदर मुलीचा फोटो पोउनि मदकट्टे यांनी वपोनि श्री प्रविण भगत यांना पाठविताच वपोनि श्री प्रविण भगत यांनी त्या मुलीचे फोटो तिचे नातेवाईक कनल सरजित यादव यांना संपर्क साधून पाठविले असता सदरची मुलगी ही त्यांची नातेवाईक कु. काजल राजेंद्र यादव होच असल्याची खात्री पटविली. 


तदनंतर पोउनि. मदकट्टे यांनी सदर मुलीस जे. जे. अक्ट कलम ३१(१) प्रमाणे संरक्षणकामी ताब्यात घेवून तिला सुरक्षित बालसुधारगृह, उमरखाडी डोंगरी, मुंबई येथे ठेवण्यात आलेले आहे. व सदर मुलगी मिळून आलेबाबत पोलीस कंट्रोल रुम, भोपाळ येथे माहिती दिलेली आहे. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी दिली आहे.


मा. श्री कैसर खालिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा. श्री. एम. एम. मकानदार, पोलीस उपआयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, श्री प्रविण भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनखाली पोउनि. श्रीमती. ज्योती मदकट्टे व श्री अर्जुन सांगळे यांच्यासह सपोफौ श्री. रामचंद्र मोरे, श्री भागीरथ वाघ, ईश्वर जाधव, अविनाश पवार, संतोष माने, इजाज सिध्दीकी, योगेश सरवदे, नितीन खरात, अरविंद खाडे व अनुश्री गायकवाड सर्व नेमणूक सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांनी फक्त त्या अल्पवयीन मुलीच्या आधारकार्डवरील फोटोवरुन हजारो रेल्वे प्रवाशांच्या गर्दीत शिरून रात्रीच्या वेळेस बुध्दी कौशल्याने शोध घेवून तिला ताब्यत घेवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेले आहे. 




















प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज