Ticker

6/recent/ticker-posts

ठाण्यात परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी

चाकू हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे तुटली

दादासाहेब येंधे : रस्त्यात ठाण मांडून बसलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांची ठाण्यातही दहशत निर्माण झाली, असून कासारवडवली नाक्यावर या फेरीवाल्यांवर कारवाई करणेस गेलेल्या ठाणे महापालिकेचा माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना सोमवारी भयंकर महागात पडले. अमरजीत यादव नावाच्या फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळे यांनी बचावासाठी हात वर केला आणि चाकूचा वार झेलणारी त्यांची दोन बोटे तुटून पडली. त्यांच्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले.

कल्पिता पिंपळे यांना जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अमरजीत यादव यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला.

मागील आठवड्यापासून ठाणे महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी कल्पिता पिंपळे यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करताच संतप्त झालेल्या यादव नावाच्या या फेरीवाल्याने चाकू हल्ला केला. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला आणि चाकूचा वार त्यांच्या हातावर झेलला. त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे त्यामुळे कापली गेली व तुटुन खाली पडली. स्थानिक नागरिकांनी व बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न करता यादवने तोच चाकू स्वतः च्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. परंतु थोडावेळ चाललेल्या या थरार नाट्यानंतर अमरजीत यादवला मोठ्या शिताफीने पकडून कासारवडवली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

व्हिडिओ पहा...👇


















Video : viral 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या