८ माचॅ ‘जागतिक महिला दिनाच्या ‘ निमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
“ सुरक्षित रस्ते , सुरक्षित शहर
हीच नवी मुंबई पोलीसांची ओळख!”
हे ब्रीदवाक्य घेऊन महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध असणार्या महिला पोलीस अधिकारी व कमॅचारी यांची विशेष बाईक रॅली उद्या ८ माचॅ रोजी पोलीस आयुक्त कायाॅलय येथून ११.३० वा. सुरु होईल. सदर रॅलीचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात येईल . सदर कायॅक्रमाला मा. सह पो. आयुक्त डॅा. जय जाधव व मा. अप्पर पो . आयुक्त डॅा. शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. सदर कायॅक्रमामध्ये सामाजिक अंतर पाळण्यात येणार असून सहभाग घेणार्या अधि./ कमेऱ्यांची संख्या मयॅादित ठेवण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या