पत्रकार उत्कर्ष समिती- मुंबई विभाग- कार्यकारणी ची पहिली मिटिंग उत्साहात संपन्न - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, ७ मार्च, २०२१

demo-image

पत्रकार उत्कर्ष समिती- मुंबई विभाग- कार्यकारणी ची पहिली मिटिंग उत्साहात संपन्न

मुंबई : पत्रकार उत्कर्ष समिती -मुंबई विभाग कार्यकारिणी सदस्यांची  पहिली  मिटिंग रविवार  दि. ७ मार्च रोजी डॉ.शिरोडकर शाळा, परेल मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

 समितीचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे  यांनी  पत्रकार उत्कर्ष समितीबद्दल सविस्तर माहिती देत समितीची कार्यपद्धत, कामाचे नियोजन,वर्षभरातील कार्यक्रमांचे आयोजन याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी  मुंबई शाखेच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान करण्यात आले. 

सर्वांचे विचार समजून घेऊन,विचारांची देवाणघेवाण करुन

 " एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ "  या उक्तीप्रमाणे  सर्वांच्या सहकार्याने समितीचे काम पुढे न्यायचे आहे. याचा उच्चार आपल्या संभाषणात केला. दरम्यान, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई विभागाच्या अध्यक्ष पदी पंकजकुमार पाटील यांची  नियुक्ती केले असल्याचे पत्र देऊन,उपाध्यक्ष म्हणून दादासाहेब येंधे, सचिव म्हणून  केतन भोज तर सदस्यपदी शांताराम गुडेकर,प्रशांत भाटकर,सुभाष कोकणे , दिपक कारकर यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करून त्यांना समितीचे ओळखपत्र देण्यात आले.

या मीटिंगला समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे , राज्य सदस्य ज्ञानेश्वर कोळी,  महिला उत्कर्ष समितीच्या नवनियुक्त मुंबई अध्यक्षा संपदा कारेकर  देखील उपस्थित होत्या. मुबंई शाखा पदाधिकारी व सदस्य मिटिंग ला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे अध्यक्षांनी आभार मानले.

शेवटी राष्टगीताने मिटिंगची सांगता झाली.

IMG-20210307-WA0010

IMG-20210307-WA0011

IMG-20210307-WA0012

IMG-20210307-WA0013

IMG-20210307-WA0014

IMG-20210307-WA0015















फोटो : व्हायरल 

प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *