कॉलेजेस १५ फेब्रुवारीपासून सुरू - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

कॉलेजेस १५ फेब्रुवारीपासून सुरू

मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी  संलग्नित महाविद्यालय १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येतील अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून तशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याचे सामंत म्हणाले. कोरोनाची भीती कायम असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये आणि संबंधित महापालिका नगरपालिका किंवा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता करावी. ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्यात यावा. कोरोनामुळे शहरातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात गेले आहेत त्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पर्याय उपलब्ध करावा. १५ टक्के उपस्थितीची अट शिथिल करावी व सुविधा तपासून वसतिगृह सुरू करावे. सध्या निम्म्या विद्यार्थ्यांना वर्गात बसू द्यावे. परिस्थिती पाहून मार्च नंतर विद्यार्थी संख्या वाढवण्यास मुभा दिली जाईल असेही सामंत यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज