Ticker

6/recent/ticker-posts

पालिका शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल

मुंबई, दादासाहेब येंधे : पालिका शाळांचे नामांतर करत डिजिटल शिक्षणावर भर देणारे यंदाचा मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती चा अर्थसंकल्प सादर झाला २०२१- २२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात २९४५.७८ जास्त कोटींची तरतूद केली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा १.१९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आता पालिका शाळा असा उल्लेख होणार नाही.


पालिकेच्या शाळांना यापुढे 'मुंबई पब्लिक स्कूल' संबोधले जाईल. तसा लोगो तयार केला जाईल. या शाळांना नवी ओळख देण्यासाठी शाळांमध्ये पायाभूत सुविधा करण्यात येणार आहेत. शाळा अद्यावत करण्यासोबतच या शाळांचे नामकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या