Ticker

6/recent/ticker-posts

दादरा-नगरच्या खासदाराची आत्महत्या

मुंबईतील हॉटेल मध्ये आढळला मृतदेह, आत्महत्येपूर्वी चिठ्ठी

मुंबई : दादरा- नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे खासदार मोहन डोलकर (वय ५८) यांनी सोमवारी मरिन ड्राईव्ह येथील 'सी ग्रीन' या हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी डोलकर यांनी गुजरातीमध्ये लिहिलेली चार पानी चिठ्ठी पोलिसांना सापडली असून यामध्ये त्यांनी दादरा-नगर हवेली मधील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. खासदार असूनही वारंवार अपमानित केले जात असल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या