Ticker

6/recent/ticker-posts

कारवाईनंतर उतार

नव्या रुग्णाच्या संख्येमध्ये रविवारच्या तुलनेत घट

मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यात झपाट्याने होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीने चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आणि कारवाई, चाचण्या यावर भर देण्यात आला. नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांतर्फे कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याचा परिणाम दिसला असून रविवारच्या तुलनेमध्ये सोमवारी नव्या बाधितांच्या संख्येला किंचित उतार पोलिसांच्या धडक कारवाईमुळे लागला आहे. मास्क आणि सुरक्षित वावर यांच्या नियमांचे कसोशीने पालन ठरत असल्याचे दिसून येत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या