Ticker

6/recent/ticker-posts

लग्न सोहळा आणि पब बार मधील गर्दीवर बडगा

 मुंबई महापालिकेकडून कारवाई

कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी मुंबई पालिकेने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून, त्यात रविवारी चेंबूर येथे जिमखान्यात लग्न सोहळा सोबतच अंधेरीत नियमभंग करणाऱ्या बारवर कारवाई केली आहे. या कारवाईवेळी लग्नसोहळ्यात ३०० हून अधिक जण सहभागी होते. तर रात्री १ नंतरही पब सुरू होते. आणि तिथे ५० टक्क्यांहून अधिक ग्राहक एकत्र आल्याचे आढळले. 

चेंबूर पश्चिम येथील छेडा नगर येथे परवानगी न घेता लग्न सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी जवळजवळ ३०० हून अधिक वऱ्हाडी जमले होते. या प्रकारे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सोहळ्याची पालिकेने गंभीर दखल घेतली. त्यावर रविवारी रात्री कारवाई करताना पालिकेच्या एम/ पश्चिम विभागाने छेडा नगर जिमखाना व रिक्रिएशन सेंटरचे व्यवस्थापक, केटरिंग सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदारांचे, वधू-वर यांच्या वतीने जिमखान्यात नोंदणी करणाऱ्या कुटुंबीयांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या