मुंबई, दादासाहेब येंधे : मेक अप मुंबईसाठी विविध विकास कामे जाहीर करत त्यासाठी तब्बल १८ हजार ७५० कोटी रुपये ९९ लाख रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करणारा २०२१- २२ चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी सादर केला. नेहमीप्रमाणे या अर्थसंकल्पातही मुंबईकरांवर कोणत्याही नव्या करांचा बोजा नाही; मात्र वाढलेला खर्च भागवण्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागतील, अशा शब्दात पालिका आयुक्तांनी या वर्षात कोणत्याही क्षणी मुंबईकरांच्या माथी या ना त्या प्रकारचा नवा कर लादण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र प्राधिकरण या अर्थसंकल्पात जाहीर केले आहे.
या अर्थसंकल्पात
कोस्टल रोडसाठी २ हजार कोटी रुपये, गोरेगाव लिंक रोडसाठी १ हजार ३०० कोटी रुपये, रस्ते, वाहतूक व पुलांसाठी १ हजार ६०० कोटी रुपये, आरोग्य १ हजार २०६ कोश रुपये अशी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा