मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील बांगुर नगर मधील लक्ष्मी पार्क स्टुडिओला मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत दहा हजार स्क्वेअर फूट परिसरात असलेल्या संपूर्ण स्टुडीओ आगीत खाक झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. स्टुडिओमध्ये चित्रीकरण झाल्यानंतर प्रयास, सैफ अली खान, देवदत्त नागे हे कलाकार तीनच्या आसपास बाहेर पडले होते. त्यानंतर स्टुडिओला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग सहाव्या मजल्यावर लागली होती. आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.

0 टिप्पण्या