Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅकवर उडी मारून वाचवला वृद्धाचा जीव

 कॉन्स्टेबल सुजितकुमार निकम यांचा गृहमंत्र्यांकडून गौरव

मुंबई, दादासाहेब येंधे : लोकल पकडण्यासाठी पुलाचा वापर न करता रेल्वे ट्रॅकवरून निघालेल्या वृद्धाचा जीव स्वतःचा जीव धोक्यात घालून बोरवली लोहमार्ग पोलिसात कार्यरत पोलिस शिपाई एस. बी. निकम यांनी वाचवला. 

गणपत सोलंकी (वय वर्ष ६०)  हे दहिसर येथे राहत असून काही कामानिमित्त खार येथे निघाले होते. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ आलेली धीमी लोकल त्यांनी पाहिली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून ती पकडता यावी, यासाठी पुलाचा वापर न करता ४ क्रमांकाच्या ट्रॅकवर त्यांनी उडी मारली. मात्र, त्याचवेळी ३ क्रमांकाच्या प्लॅटफार्मवर त्यांना विरार धीमी गाडी येताना दिसली. या गाडीखाली आपण चिरडले जाणार, या भीतीने ते गोंधळले. त्यांना फॉर्मवर पुन्हा चढता येत नव्हते. घाबरून ते तेथेच उभे राहिले. हे लक्षात येताच पोलीस शिपाई एस. बी. निकम यांनी क्षणाचाही विलंब न लावता ट्रॅकवर उडी मारून सोलंकी यांना खेचून वर घेतले आणि मागोमाग विरार लोकल त्या ट्रॅकवरून पुढे गेली. सोलंकी यांना बोरवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर त्यांच्या मुलासोबत त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले. सोलंकी यांच्या मुलांनीही निकम व  लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.









 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या