मुंबई : थर्टी फर्स्ट निमित्त दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांनी यंदा कोरोनाचा धसका घेतलेला पाहायला मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत यंदा नशा करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी दिसून आली.
मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करीत ठिकठिकाणी तपासणी सुरू केली होती. चालक दारूच्या नशेत आढळल्यास वाहनात त्यासोबत असलेल्यांवर देखील कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार होता. त्यामुळे मुंबईकरांनी या कारवाईचा धसका घेतलेला पहावयास मिळाला.तर काहीजणांनी दारूच्या नशेत वाहन चालविणे टाळून पोलिसांना सहकार्य केले. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ कलमाअंतर्गत ४३ गुन्हे नोंद झाल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली.

0 टिप्पण्या