Ticker

6/recent/ticker-posts

टाटांच्या भेटीने जिंकली मने...

कामगारांशी संवाद; आजारी निवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी भेट

मुंबई :  कामाच्या ताणतणावात व्यस्त असणाऱ्या कामगारांना मंगळवारी सुखद धक्का बसला. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कंपनीत कामगारांची संवाद साधल्याने ते भारावून गेले. एवढेच नव्हे तर कामगारांच्या तब्येतीची आवर्जून विचारपूसही केली. या काळात त्यांनी केलेल्या मदतीचे कौतुक होत असताना आता थेट कंपनीतील कामगारांच्या भेटीगाठीमुळे रतन टाटांनी पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकली आहेत. रविवारी पुण्यात एका माजी कर्मचाऱ्याचे घर गाठत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

कोणताही बडेजाव किंवा सुरक्षेचा बाऊ न करता त्यांनी पिंपरी कंपनीतील कामगारांशी संवाद साधला. दरवर्षी ते पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आवर्जून भेट देत असतात. कोथरूड परिसरात एका सोसायटीत कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी त्यांनी थेट त्याचे घरचे गाठले. त्यामुळे ते माजी कर्मचारीही भारावून गेले. सुमारे पाऊण तास त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. हे सहकारी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आरोग्याची विचारपूस करून ते परतले. पार्कींग मध्ये तेथील काही जणांशी त्यांनी सहजपणे संवाद साधला. ध्येयावर लक्ष केंद्रित करा, त्यापासून कधीही विचलित होऊ नका असा कानमंत्र त्यांनी दिला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या