शेअर मार्केटचा नवा उच्चांक
मुंबई : मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्सने आज शुक्रवारी अखेर त्याच्या स्थापनेतील वरच्या टप्प्याला गाठलेच. एकाच व्यवहारातील ४४०.९० अंश वाढीमुळे मुंबई निर्देशांक प्रथमच ४५ हजारापुढे ४४,०७९.५५ वर झेपावला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीने १२४.६५ अंशवाढीमुळे १३,२५८.५५ हा नवा टप्पा गाठला. सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहारात ४५ हजाराला स्पर्श केला होता. मात्र, शुक्रवार सत्रअखेर या टप्प्यावर स्थिरावणे त्याला शक्य झाले, तर निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात ऐतिहासिक उच्चांक गाठला. व व्यवहारात तो १३,२८०.०५ पर्यंत उंचावला गेला.
0 टिप्पण्या