परस्पर रक्कम बँक बरोडा त्यानंतर पे टी एम मध्ये वळवून फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
मुंबई, दादासाहेब येंधे : वडाळा टीटी पोलीस ठाणे येथे गु .र. क्र.381/2020 कलम ४१९,४२० भा. द. वि. सह ६६(क)(ड)आयटी कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपीने बँक ऑफ बरोडा बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या बँक खाते बंद होणार असल्याचे खोटे सांगून फिर्यादी यांच्या खात्यातील ५लाख ८४ हजार रु इतकी रक्कम परस्पर बँक बरोडा त्यानंतर पे टी एम मध्ये वळवून फसवणूक केल्याने मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांच्या आदेशाने वडाळा टी टी पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्याच्या तपासकामी झारखंड येथे रवाना केले.
सदर आरोपी ची माहिती घेत असताना आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हा १८ आय.एम .इ. आय. क्रमांकावर वापरण्यात आल्या नंतर त्या आय .एम. इ .आय. ची माहिती घेतली असता त्यावर ४०२ मोबाईल क्रमांक वापरण्यात आले होते. सदरचे सिम कार्ड हे पश्चिम बंगाल येथिल पत्त्यांचे असल्याने नक्की त्यांचा ठावठिकाणा समजून येण्यास अडचण निर्माण झाली होती. तसेच आरोपीचे बँक खाते हे गुजरात पत्ता वरील असल्याने आरोपीने सदरचा गुन्हा हा नियोजनबद्ध केल्याचे दिसून येत होते.
सदर क्लिष्ट गुन्ह्याचा तपास तांत्रिक मदतीच्या साहाय्याने तपास करून आरोपी चा ठाव ठिकाणा प्राप्त केला असता आरोपी हा रहाते घरी न राहता शेता मध्ये लपून राहत असल्याची माहिती मिळाली होती.स्थानिक पो.ठाण्याची मदत घेऊन आरोपीस .गाव -जोंका, पोस्ट- कर्मा, थाना-टालझारी, जिल्हा-डुमका,(झारखंड )येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
गंगाधर दुखन मंडल, वय-२१ वर्षे, रा ठी.गाव जोंका, पोस्ट कर्मा, थाना-टालझारी, डुमका,झारखंड
सदर बाबत आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला सॅमसंग कंपनीचा (१००० रु किमतीचा)मोबाइल,स्वतःच्या वापरा साठीचा एमआय कंपनीचा दुसरा मोबाईल फोन (६००० रु), रोख रक्कम ४० हजार रु पंचनाम्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आली आहे.
गुन्हे प्रकटीकरण -सपोनि अजय बिराजदार, पी एन 34516/गायकवाड, पीसी 080067/पवार, पीसी 113444/जावीर हे पथक ७-८ दिवस सदर ठिकाणी थांबले होते व सतत आरोपीचे मागावर होते. आरोपी कडील मोबाईल फोन मधे 2G Frequency चे सिन कार्ड असल्याने Location मिळणे कठिण झाले होते. पण, तपास तांत्रिक मदतीच्या साहाय्याने करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती वडाळा टी टी पोलीस ठाणेचे व.पो.नि.शैलेश पासलवार यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या