मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताची टंचाई भासत आहे. अवघे पाच ते सहा दिवसांचा रक्तसाठा रुग्णालयात असून त्याची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना जीवनदान देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा, रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.

0 टिप्पण्या