Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत शांतता... बाजार मात्र ओस

सरकारी कार्यालयांत कमी गर्दी

मुंबई, दादासाहेब येंधे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधातील भारत बंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद लाभला. या बंदला राज्यात शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे मुंबईत याचे नेमके काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते. पण, मुंबईत शांततेत बंद पार पडला. मुंबईतील लालबाग, परळ, दादर, प्रभादेवी, काळाचौकी, वरळी, शिवडी, अंधेरी, विलेपार्ले, कुर्ला आदी भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला.  शहरातील आणि उपनगरातील बाजारपेठा, फळबाजार, फुल बाजार काही प्रमाणात बंद होते. मात्र, मुंबई लोकलसेवा, बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा आदी सेवा सुरळीत होत्या.

मुंबईत सरकारी कामानिमित्त येणाऱ्यांची वर्दळ नव्हती. त्यामुळे अनेक कार्यालयांत शुकशुकाट होता. लोकल सेवा सुरू ठेवण्याकरिता रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.



बोरिवली येथील कडकडीत बंद 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या