Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे २० टक्के काम पूर्ण

 'मावळा' नव्या वर्षात बोगदा खणणार

मुंबई, दादासाहेब येंधे : पश्चिम उपनगरातून थेट दक्षिण मुंबई गाठण्यासह वाहतुकीचा वेग वाढून भविष्यातील मुंबई सुपरफास्ट व्हावी यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास जुलै २०२३ उजाडणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रियदर्शनी पार्क येथील बोगदा करण्यासाठी चीनमधून आयात करण्यात आलेले 'मावळा' नावाचे टनेल बोरिंग मशीन आता मुंबईच्या पोटात म्हणजेच जमिनीत उतरविण्यात आले, असून याद्वारे दोन बोगदे खाण्यात येथील. एक बोगदा नऊ महिने असे दोन बोगदे खाण्यास अठरा महिने लागणार असून पहिला बोगदा करण्याचे काम नव्या वर्षात सुरू होईल.

 मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत असणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रवासाची वेळ कमी होणार असून रस्त्यांची रहदारी कमी होईल. तसेच वायू आणि ध्वनिप्रदूषणाचीही पातळी कमी होणार आहे. अतिरिक्त हरितपट्ट्याची निर्मितीही करण्यात येणार आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या