मुंबईत मात्र लोकल, बेस्ट, टॅक्सी सेवा राहणार सुरू
मुंबई, दादासाहेब येंधे : केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये शेतकरी, कामगार संघटनांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच आदी पक्षही सामील होणार आहेत.
दरम्यान, मुंबईतील बेस्ट, लोकल व टॅक्सी सेवा मात्र सुरू राहणार आहेत. एसटी सेवा देखील सुरू राहणार असली तरी या बंदमुळे एसटीचे नुकसान होऊ नये म्हणून काही भागांत एसटी सेवाही बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





0 टिप्पण्या