Ticker

6/recent/ticker-posts

डिसले सरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

'डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणार'

मुंबई, दादासाहेब येंधे : जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल युनेस्को व लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मामचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. डिसले सरांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या