स्वारगेट पोलीसांकडून वाघाच्या कातड्याची तस्करी करणारे जेरबंद
स्वारगेट पोलीस स्टेशन व.पो.नि श्री ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्वारगेट पो स्टे तपास पथकातील पो उप निरी सुरेश जयभाय व पो हवा सचिन कदम पो.शि ज्ञाना बडे ,पो.शि मनोज भोकरे, अमित शिंदे पो स्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पो.शि ज्ञाना बडे व पो.शि मनोज भोकरे यांना मिळालेल्या माहितीवरून इसम नामे शकीलजान महंमद शेख रा -अप्पर डेप्पो पुणे हा वाघाची कातडी व वाघ नखे घेऊन ते विकण्यासाठी सारसबाग रोड वरील कोथरुड बसस्टॉप येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ काळ्या रंगाच्या बॅगमध्ये *एक वाघाचे कातडे व नखे मिळून आले. (अंदाजे कि -1500000/-पंधरा लाख ) सदर बाबत वन अधिकारी यांना कळविले असता त्यांनी येऊन पडताळनी करून पहिले असता सदर कातडे हे वाघ या प्राण्याचे असल्याचे सांगितले त्यावरून सदर बाबत स्वारगेट पो स्टे गु .र .न -1676/2020 वन्यजीव सरक्षण कायदा सन 1972 चे कलम 9,39,48,(अ) 49,50,51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर आरोपीस अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही, सागर पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर, सर्जेराव बाबर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगटे विभाग पुणे शहर, ब्रह्मानंद नाईकवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री.सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे ) स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकाचे स पो नि अमोल रसाळ पोलीस उप निरीक्षक श्री.सुरेश जयभाई, पोलीस हवालदार महेंद्र जगताप सचिन कदम पो हवा पाटील ,पंढरीनाथ शिंदे, मुंडे, विजय कुंभार विजय खोमणे सचिन दळवी वैभव शीतकाल अमित शिंदे ज्ञाना बडे मनोज भोकरे शंकर गायकवाड यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.

0 टिप्पण्या