Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईतही मिळणार 'कुल्हड चाय'

 कुल्हड चाय' आता मुंबईकरांनाही मिळणार

मुंबई, दादासाहेब येंधे :  'कुल्हड सी चाय और कुल्हड इश्क हर जगह मिलना बहुत मुश्किल है...' असे कौतुक कुल्हड अर्थात मातीच्या भांड्यात मिळणाऱ्या चहाच्या वाट्याला येते. मुंबईतील चहा प्रेमींना आता हाच कुल्हड चहा मुंबईतील रेल्वे स्थानकांत उपलब्ध होणार आहे. तेही नियमित चहाच्या दरात... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोबतच दादर, ठाणे, पनवेल कल्याण, इगतपुरी कर्जत आणि लोणावळा या स्थानकांवरील स्टॉलवर कुल्हड चहा विक्री करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कुंभारांना रोजगाराचे साधन मिळावे यासाठी देशातील प्रमुख रेल्वे स्थानके, बस आगार विमानतळ आणि मॉलमध्ये चहा देण्यासाठी कुल्हड बंधनकारक करण्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मंत्री पियुष गोयल यांना दिले होते. त्यामुळे प्लास्टिकसह कागदापासून तयार होणाऱ्या ग्लासांचा चा वापर बंद होईल. परिणामी, कचराही कमी होईल. अशी त्यामागची संकल्पना आहे. सध्या देशात चारशेहून अधिक रेल्वे स्थानकात कुल्हड चहा उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या