Ticker

6/recent/ticker-posts

एनयूजे चे आझाद मैदान येथे आंदोलन

एनयूजे चे आझाद मैदान येथे आंदोलन 
दादासाहेब येंधेशुक्रवार दि ११ डिसेंबर २०२० रोजी आझाद मैदान मुंबई येथे मर्यादित संख्येत श्रमिक पत्रकारांठी करण्यात आलेल्या काळ्या कायद्याचा निषेध करण्यात आला. जवळजवळ  चार तास चालू असलेल्या  या आंदोलनामुळे हा परिसर दुमदूमुन गेला होता.  

केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कायद्यात पत्रकारांचे विशेषाधिकार काढले. वेजबोर्ड बनविण्याचा अधिकार संपवला. माध्यमकर्मींना कधीही कामावरुन काढण्याचा अधिकार मालकांना दिला. या काळ्या कायद्याविरोधात आक्रोश आंदोलन दि ११डिसेबर २०२०रोजी मुंबईत एनयुजे महाराष्ट्र तर्फे पार पडले.
 
या प्रसंगी एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर  यांनी सांगितले की, लोकशाहीचा ४था स्तंभ या कायद्याने वेठबिगार होणार आहे. चौथा स्तंभ नव्हे तर लोकशाहीला संपवण्याचे हे काम आहे. आमचे म्हणजे जनतेच्या लोकशाहीच्या राजाच्या मतावर निवडून आलेल्या सरकार आम्ही आमचे हिताचे काम करण्यास निवडून दिलेय. मचे हक्क काढून घेण्याचा, जीवघेणे कायदे करण्याचा अधिकार दिलेला नाही. येत्या अधिवेशात महाराष्ट्र सरक्रारने आपली भूमिका जाहीर करावी. आमचे म्हणणे केंद्रापर्यत पोहचवून सुधारणा करवून घ्यावी तोपर्यत हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये.

तसेच पत्रकारांना न्याय हक्क सन्मान मिळावा म्हणून पत्रकार रजिस्ट्रेशन, पत्रकार महामंडळ, त्रिपक्षीय समिती, सामुहिक आरोग्य वीमा, पत्रकार सन्मान योजना, सुरक्षा कायद्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. पत्रकारांसाठी सर्वसमावेशक  निश्चित धोरण या महामंडळ माध्यमातून आखले जावे.  आमचेबाबतचे निर्णय इतर तीन स्तंभानी परस्पर घेऊ नये. यात आमचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे.

येत्या काळात तातडीने मुख्यमंत्र्यांनी आमचेबाबतीत निर्णय करावा अन्यथा आझाद मैदानातून सुरु झालेली ही क्रांतीची ठिणगी सर्वत्र पसरेल. चिपको आंदोलनाप्रमाणेच आम्ही सच्चे पत्रकार लोकशाहीचा स्तंभ ठासळू न देण्यासाठी आक्रमकपणे आमचे हक्कासाठी लढत राहू. मोठी आंदोलने राज्यभरात होतील. केंद्र सरकारने आणीबाणीपेक्षा भयंकर आणीबाणी आमचे जगण्याचे आणि आमचे हक्कावर अधिकारावर लावली आहे. येत्या काळात हा वणवा देशभरात पसरेल असा इशारा करदेकर यांनी दिला.

               



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या