Ticker

6/recent/ticker-posts

महिलांच्या डब्यात लागणार टॉक-बॅक

 मुंबई, दादासाहेब येंधे: लोकल प्रवास महिलांच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलमधील महिलांच्या डब्यात टॉप- बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिलांना आपात्कालीन परिस्थितीत मोटरमन आणि गार्ड सोबत संवाद साधणे सहज शक्य होणार आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये ही यंत्रणा कार्यरत आहे. महिलांच्या डब्यात दरवाजाच्या शेजारी एक बटन लावण्यात आले असून ते आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. हे बटन तीन सेकंदांपर्यंत दाबल्यानंतर गार्डशी संपर्क साधता येईल. गार्डला पॅनेलवर नेमकं कोणत्या डब्यातून कॉल आला, ते कळण्यास मदत होणार आहे. टॉक बॅक यंत्रणा ध्वनिक्षेपकाने जोडण्यात आली आहे. या स्थितीत मुख्य नियंत्रण कक्ष, मोटरमनशी संपर्क साधून त्याची माहिती, घेऊ शकतात. १३ डब्यांच्या लोकल मध्ये एकूण १५ टॉक बॅक बसविण्यात येणार आहेत. येत्या एका वर्षात यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या