Ticker

6/recent/ticker-posts

सरकारी कर्मचाऱ्यांनो कार्यालयात 'ड्रेस- कोड'

मुंबई, दादासाहेब येंधे : मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आता ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. यानुसार जीन्स अथवा टी-शर्ट घालणे निषिद्ध असेल. पायात स्लीपरही वापरता येणार नाही. तसेच आठवड्यातून एकदा शुक्रवारी खादीचे कपडे वापरण्यात यावेत असा आदेश काढण्यात आला आहे. 
कायम स्वरूपी अधिकारी-कर्मचारी, कंत्राटी अधिकारी-कर्मचारी आणि सल्लागारांसाठी या मार्गदर्शक सूचना सरकारने जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाचे प्रतिनीधी म्हणून राज्य शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेशभूषा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे अंग ठरते. संबंधितांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची छाप पडते. यामुळे आपली वेशभूषा ही शासकीय कार्यालयास किमान अनुरूप ठरेल याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. असे स्पष्ट करत सामान्य प्रशासन विभागाने ड्रेस कोडबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

महिला : साडी, सलवार, चुडीदार-कुर्ता, ट्राउजर व त्यावर कुर्ता अथवा शर्ट. आवश्यक असल्यास दुपट्टा.

पुरुष : शर्ट-पॅन्ट, ट्राउजर आवश्यक, गडद रंगाचे, नक्षीकाम -चित्रे असलेले पेहराव नकोत. जीन्स-टी शर्ट अमान्य.





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या