पीएमसीच्या खातेदारांची आझाद मैदानात निदर्शने
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मल्टिशेड्यूल्ड बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहा रप्रकरणी शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करत आम्हाला हक्काचे पैसे मिळावे, अशी मागणी करत केंद्र सरकारला आर्त हाक दिली. दिवसभर निदर्शने करून खातेधारांनी सर्वांचे लक्ष वेधले. दुपारी १२ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आझाद मैदानावर न्यायहक्कांसाठी खातेदारांनी निदर्शने केली. निदर्शनात मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यातील खातेदारांनी सहभाग घेतला होता.
0 टिप्पण्या