Ticker

6/recent/ticker-posts

बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण

मुंबई, दादासाहेब येंधे : टाटा मोटर्स कंपनीच्या २६ बेस्टच्या इलेक्ट्रिक बस काल बेस्ट मध्ये दाखल झाल्या. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बसेसचे शुक्रवारी नरिमन पॉईंट येथे दिमाखात लोकार्पण करण्यात आले. या बसेसमुळे इंधनाची बचत होणार असून प्रदूषणास मोठा आळा बसणार आहे. दिव्यांगांसाठी लिफ्टची सुविधा असणाऱ्या देशातील या पहिल्याच बसेस असून या बसेससाठी टाटा कंपनी मुंबईच्या चार डेपोंमध्ये चार्जिंग स्टेशनही उभारणार आहे. 

या बसेस संपूर्ण प्रदूषणमुक्त व वातानुकूलित असून महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टीम, प्रशस्त प्रवेशद्वार अशा सुविधा आहेत.



फोटो: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विद्युत बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या