शक्ती कायद्यामुळे नराधमांना २१ दिवसात होणार फाशी-विधेयक मंजूर
मुंबई, दादासाहेब येंधे : महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेल्या 'शक्ती' कायद्याचे दोन विधेयके सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत मांडली. गुन्हेगारांना या कायद्यामुळे जरब बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ दिवसांमध्ये खटल्याचा निकाल बलात्कार, ऍसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचार यांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडाची तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे.
या विधेयकामध्ये महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र अपलोड करणे यासाठीच्या गुन्ह्यात पंधरा दिवसात गुन्ह्याचा तपास आणि आरोपपत्र दाखल करावे तसेच आरोपपत्र दाखल झाल्यावर तीस दिवसात सुनावणी पूर्ण व्हावी अशी देखील तरतूद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा