मुंबईत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम
मुंबई : मुंबई परिसरात शनिवार-रविवारी सुरू असलेला रिमझिम पाऊस रविवारी रात्री आणि सोमवारीही कायम होता. त्यामुळे वातावरणामध्ये गारठा निर्माण झाला होता. पाऊस थांबला असे वाटत असतानाच कपाटात ठेवून दिलेल्या छत्र्यांना सोमवारी अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बाहेर काढण्याची वेळ मुंबईकरांवर आली. नवी मुंबई, कुलाबा आणि उत्तर मुंबईत काही भागांमध्ये पावसाचा जोर उर्वरित मुंबईपेक्षा तुलनेने अधिक होता. आज मंगळवारी ही ढगाळलेल्या वातावरणाचा अंदाज मुंबईकर घेत आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.



0 टिप्पण्या