Ticker

6/recent/ticker-posts

नो मराठी नो अमेझॉन

मुंबईत मनसेकडून फलक

मुंबई, दादासाहेब येंधे : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. अमेझॉन विक्री पोर्टल अमेझॉनवर 'मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा', यासाठी मनसेकडून मुंबईभरात अमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर "नो मराठी, नो अमेझॉन" असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी ऑनलाईन  शॉपिंगमध्ये अग्रेसर कंपन्यांना मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यांनी वांद्रे पूर्व, पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रिक्लेमेंशनच्या परिसरातील रस्त्यांवर फलक लावले आहेत. अमेझॉनकडून यावर कोणता तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या