प्रवाशांनी अनुभवला गारेगार प्रवास
मुंबई, दादासाहेब येंधे : एसी लोकलचे तिकीट
आणि पास असणाऱ्या प्रवाशांनीच एसी लोकलचा प्रवास करावा अशी उद्घोषणा होत छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान गुरुवारी एसी लोकल धावली.
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी अनेक वर्षांपासून एसी लोकलची वाट बघत होते, अखेर पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेवरही पहिली एसी लोकल गुरुवारी पहाटे ०५.४२ वाजता कुर्ला स्थानकातून सीएसटीच्या दिशेने रवाना झाली. अनलॉकच्या टप्प्यात पश्चिम रेल्वे मार्गावरही एसी लोकल धावण्यास सुरुवात झाली आहे; मात्र या एसी लोकलमध्ये बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी प्रवास करत आहेत. तसेच मध्य रेल्वेमार्गावरील सीएसएमटी ते कल्याण या मार्गावरील एसी लोकललाही पहिल्या दिवशी किरकोळ प्रतिसाद मिळाला. एसी लोकलची सेवा सोमवार तर शनिवारी सुरू राहणार असून सर्वच स्थानकांवर ही लोकल थांबेल.



0 टिप्पण्या