Ticker

6/recent/ticker-posts

सीएसएमटी- कल्याण एसी लोकल लवकरच सुरू होणार

मुंबई, दादासाहेब येंधे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर येत्या काही दिवसात वातानुकूलित लोकल सुरू होणार आहे. ही लोकल सेवा प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. सुरुवातीला दहा लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.

अनलॉकमध्ये वातानुकूलित विशेष मेल-एक्सप्रेस सह विमान प्रवासही सुरू झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंगळवारी रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. विना वातानुकूलित लोकलच्या जागी या वातानुकूलित लोकल धावणार आहेत. त्यामुळे लवकरच या लोकल फेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

सध्या ९९ टक्के लोकल सेवा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू आहेत. वातानुकूलित सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वासही रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि विरार मार्गासह अन्य निवडक मार्गांवर वातानुकूलित लोकल धावताहेत. मंत्रालय तसेच बँकेतील वरिष्ठ पदावरील कर्मचारी या लोकलचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या