लसीकरण प्रशिक्षणाची पालिकेची गती वाढली
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनावर उपचार करण्यासाठी पालिकेने लसीकरण प्रशिक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. मोहिमांची गती वाढली असून गेल्या तीन-चार दिवसात सुमारे २०० डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफला प्रशिक्षण दिले आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोना चा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्युदरही कमी झाला असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. आता कोरोनाला पूर्ण हद्दपार करण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच लस देशासह मुंबईला उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र, राज्य सरकार आणि मुंबई मनपाने लसीकरण प्रशिक्षणावर भर दिला आहे.


0 टिप्पण्या