वृद्धाश्रमाला भेट देत वृद्धांबरोबर मारल्या मनमोकळ्या गप्पा
मुंबई, दादासाहेब येंधे : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट ने काल रविवारी मुंबईतील माझगाव येथील दि सेंट होम या वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या. तसेच जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
वृद्धाश्रमाच्या संचालिका शारदा जोएल, क्षेत्रे मॅडम यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तदप्रसंगी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार श्रेयस घाटकर, विनायक येंधे, रवींद्र जाधव, गणेश क्षीरसागर, अविनाश पवार, नागेश तांदळेकर, गणेश पार्टे, बाजीराव तुपे, वरूण वर्मा तसेच हितचिंतक प्रकाश आमोणकर व विकास बेर्डे यावेळी उपस्थित होते.

0 टिप्पण्या