मुंबई, दादासाहेब येंधे : सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे हददीत दि.२८/०६/ २०२० रोजी हातगाडी ओढणाऱ्या दोन मजुरांमध्ये दारू वरून भांडण होवून एका मजूराने दुसऱ्याचा भोकसुन खुन केला होता. सदर बाबत गु.र.क्र.१२०/२०२०, कलम ३०२ भा.द.वि. अन्यये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे श्रीधर यलमलई हरिजन उर्फ श्रीधर आण्णा, वय ६० वर्षे याचा शोध घेण्यात येत होता. सदर आरोपी हा फुटपाथवर राहणारा होता व त्याच्या हातावर तामिळपध्ये नांव नोंदविले आहे. टॅटू आहे. एवढीच गाहिती मिळाली होती.
नमूद पाहिजे आरोपीचा शोध घेणेकामी पो.नि.याकूब मुल्ला, सपोनि उगले, पो.शि.क्र. ०५०९३१/शिंदे;
पो.शि.क, ०९०४३६/सपकाळ यांचे पथक नेमण्यात आले. सदर पथकाने कुलाबा, एम.आर.ए., वाडीबंदर, मादुंगा, धारावी, अँटॉप हिल परिसरातील खबरींना माहिती देवून सतत पाठपुरावा केला असता नमूद पाहिजे आरोपी हा
मादुंगा रेल्वे स्टेशन (पूर्व) येथे असल्याबाबतची माहिती प्राप्त
झाल्याने नमूद पथकाने परिसरात सापळा लावून १०.०० वाजता त्यास ताब्यात घेवून
पोलीस ठाणेस आणून त्याच्याकडे सपोनि उगल व गुन्हे प्रकटीकरण पथकाने
गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याचा गुन्हयात
सहभाग दिसून आल्याने त्यास नमूद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा.सह पोलीस आयुक्त(का. व सु. ) श्री विश्वास नागरे पाटील, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग श्री. सत्यनारायण चौघरी, मा.पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-९१, मुंबई श्री संग्रामसिंह निशानदार, मा.सहा पोलीस आयुकक्त्त, डोंगरी विभाग, मुंबई श्री अविनाश धर्माधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे श्री संजीव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक याकूब मुल्ला, सपोनि उगले, सपोनि फरिद खान, पो.शि.क्र.०९०४३६/गणेश सकपाळ, पो.शि.क्र.०५०९३१/शिवराम शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा