Ticker

6/recent/ticker-posts

आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची पाहणी

 आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची पाहणी


मुंबई, दादासाहेब येंधे : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड कांजूर मार्ग येथे होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली. कांजूरमार्ग येथे मेट्रोच्या कामाला वेगही आला आहे. दरम्यान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी एक ट्विटही केले आहे. 

आदित्य ठाकरे यांनी आज नव्या जागेची पाहणी करून महत्त्वाची माहितीही दिली आहे. 'कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएकडे सोपावण्यात आलेल्या जागेवर आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, एमएमआरडीए, एमएमआरसीएल अधिकाऱ्यांसोबत भेट दिली आहे. सुधारित योजनेसह कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी मेट्रो ३ आणि ६ची कारशेड येथे उभारली जाणार आहे. मातीचं परीक्षण आधीच सुरू झालं आहे. जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांच्यासोबत उपस्थित होतो,' असं ट्विट त्यांनी केलं आहे.



























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या