पोलीस तपास साप्ताहिकातर्फे
कोरोना योध्याचा सत्कार
मुंबई, दादासाहेब येंधे : दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाला मदत करण्याच्या हेतूने काही पोलीस बांधव पुढे येत आहेत. त्यांना शोधून पोलीस तपास साप्ताहिक त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करीत आहे.
नुकतेच माननीय श्री. मिलिंद खेतले, सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस तपास साप्ताहिकाचे संपादक राजु ग. जाधव यांच्या शुभहस्ते त्यांना कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

0 टिप्पण्या