बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र व काडतुसे विक्री करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या तीन गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष-७, मुंबई यांचेकडून अटक
दादासाहेब येंधे :
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र् राज्य यांचे आदेशाने मुंबईसह महाराष्ट्र् राज्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्यांची गोपनीय माहिती गोळा करून त्यांचेवर शस्त्र अधिनियमान्वये व इतर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे.
दिनांक 0२/१०/२०२० रोजी कक्ष-७ चे पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांना तिन इसम त्यांच्याकडे असलेल्या अग्निशस्त्राची विकी करण्याकरीता ऐरोली टोल नाक्यावरून नवघर, मुंबई येथे त्यांच्या मो/कारने येणार असून त्यांचे कब्जात अग्निशस्त्र आहेत अशी विश्वसनिय खबर प्राप्त झाली होती. याबाबत मिळालेल्या माहितीची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडुन प्राप्त झाले होते.
नमुद प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष-७ चे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून उपरोक्त नमूद ठिकाणी सापळा रचण्यात आला. सदर ठिकाणी एक सफेद रंगाची एटीओस, मोटर कार आली व भांडूप उद्ंचन केंद्र बेस्ट बस स्टॉप, ऐरोली वाहीनी, नवघर, मुंबई या ठिकाणी रस्त्याच्या बाजुला थांबली. त्यामधुन उतरलेल्या तीन इसमांना खबरीने दिलेल्या माहीतीनुसार पोलीस निरीक्षक श्रीधनकर यांचे अधिपत्याखाली पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये दोन देशी बनावटीची पिस्टल व 0४ जिवंत काडतुसे मिळुन आली.
नमुद इसमांकडे अग्नीशस्त्र बाळगण्याबाबत कोणताही परवाना नसल्याने व त्यांनी बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याची खात्री झाल्याने त्यांचेविरूध्द नवघर पोलीस ठाणे येथे वि.स्था.ख.क्र.२२/२०२० कलम ३,२५७ भारतीय हत्यार कायदा सह ३७(१) (अ) ,१३५७ मपोका अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गु.प्र.शा.गु.अ.वि.,कक्ष (9 कडुन चालु असुन नमुद आरोपीतांनी हस्तगत अगज्नीशस्त्रे कोठुन प्राप्त केली ? व त्याचा कोणत्या कारणासाठी वापर होणार होता ? याबाबतचा तपास करीत आहे.
१) अटक आरोपी क्र.१- पुरूष इसम , वय २० वर्षे, पत्ता- करमाळा, जि. सोलापूर.
२) अटक आरोपी क्र.२- पुरूष इसम, वय २१ वर्षे, पत्ता- नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड
३) अटक आरोपी क्र.३- पुरूष इसम , वय २० वर्षे, पत्ता- बोरदरा, ता. खेड, जि. पूणे
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विरेश प्रभु, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. नंदकुमार ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) श्री. अविनाश शिंगटे, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्तुद, पोलीस उप निरीक्षक संजय सुर्वे, पोलीस हवालदार महेंद्र कालुष्टे, पोलीस शिपाई दिनेश शिंगोटे, दिपक खरे, गणेश पाटील, यांचेसह पोलीस शिपाई चालक चरणसिंग गुसिंगे यांनी सहभाग घेवून पार पाडली आहे.



0 टिप्पण्या