Ticker

6/recent/ticker-posts

बेस्टच्या मिनी बसचा अपघात

 पूर्व द्रुतगती मार्गावर नव्या बेस्ट बसला अपघात

मुंबई, दादासाहेब येंधे : भांडुपवरून वरलीकडे जाणाऱ्या बेस्टच्या नवी एसी बस क्र. २७ ला शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले आहेत.

पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. बेस्टच्या मिनी एसी बस २७ क्रमांकाच्या मार्गावरील भांडुपच्या सोनापूर विभागातून वरळीकडे ही बेस्टची बस निघाली होती. पूर्व द्रुतगती मार्गावर सदर बस भरधाव वेगात असताना या बसला एक दुचाकीस्वार आडवा गेला. त्याला वाचविण्यासाठी बस चालकाने बस उजवीकडे वळविली. मात्र, बस वेगात असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावच्या कडेला असलेल्या गोदरेज कंपनीच्या संरक्षक भिंतीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या