रंगारी बदक चाळीत दुर्गामातेचे मनोभावे पूजन
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियमानुसार काळाचौकी, रंगारी बदक चाळ येथील श्री समर्थ हनुमान मंडळातर्फे अगदी साधेपणाने दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली आहे असे मंडळाचे विश्वस्त-अध्यक्ष दत्ता झोडगे यांनी सांगितले असून रोज दुर्गादेवीचे पूजन करून कोरोना महामारीतून मुक्ती मिळू दे असे साकडे देवीला घालण्यात येणार आहे.
तसेच देवीच्या पूजनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंडळाच्या समोर हॅन्ड सॅनिटायझरची सोय केली असून दुर्गादेवीच्या भाविकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यास मंडळाकडून सांगण्यात येत आहे अशी माहिती मंडळाचे सरचिटणीस संतोष परब यांनी दिली आहे.
यावर्षी खजिनदार म्हणून संदीप तुपे तर कार्याध्यक्ष म्हणून नागेश नागवेकर हे कार्यभार संभाळत आहेत.



0 टिप्पण्या