Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी एसटीची विशेष सेवा

 महिलांसाठी एसटीच्या विशेष फेऱ्या

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई महानगर क्षेत्रात आपल्या उदरनिर्वाहासाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील महिलांसाठी पनवेल, डोंबिवली, विरार येथून सोमवारपासून विशेष एसटी सेवा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे या काळात महिलांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने येत्या सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील महिलांसाठी कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे परब म्हणाले. महिला प्रवाशांचा प्रतिसाद बघून फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत असे समजते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या