मुंबई, दादासाहेब येंधे : पहिलीतील प्रवेशासाठी सहा वर्षांची अट िश्चित करण्यात आली होती. तेव्हा मुलांचे ३१ जुलैपर्यंत वय ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ऑगस्टमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे काहीच दिवसांच्या फरकाने नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला होता.
त्यानंतर २०१७ मध्ये या निकषात सुधारणा करून ३० सप्टेंबर पर्यंतचे वय ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतरही ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला, म्हणून शिक्षण विभागाने ही अट पुन्हा बदलली. १५ ऑक्टोबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिली प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले. तरीही ही अट पुन्हा बदलण्याची पालकांची मागणी होती.
त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे कागदोपत्री प्रवेशासाठी सहा वर्ष पूर्ण अशी अट असेल.



0 टिप्पण्या