खाजगी बँक कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासास मुभा
मुंबई, दादासाहेब येंधे : सहकारी आणि खासगी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासाला रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे उपनगरात राहणाऱ्या लाखो बँक कर्मचाऱ्यांची रस्ते प्रवासातील यातनांमधून सूटका होणार आहे.
सर्व सहकारी व खासगी बँकांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १० टक्के कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पाठविला होता. रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली हा दहा टक्के कर्मचारी नक्की कोणता असावा याचा निर्णय राज्य सरकारने तसेच संबंधित सहकारी, खासगी बँक व्यवस्थापन घेणार आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारच्या विनंतीवरून आणि रेल्वे मंत्रालयाच्या मिळालेल्या परवानगीनुसार, मुंबई लोकलमधून प्रवास प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निवडक दहा टक्के बँक कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडून स्टेशन प्रवेशासाठी लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रासह स्थानकांमध्ये प्रवेश देण्यात येईल असे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

0 टिप्पण्या