Ticker

6/recent/ticker-posts

निवृत्तांना मिळाला दिलासा

 आता हयातीचा दाखला सादर करा ३१ डिसेंबर पर्यंत

मुंबई, दादासाहेब येंधे : 

राज्य सरकारच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांना आपल्या हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर, २०२०पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वित्त विभागाने शुक्रवारी घेतला. राज्य सरकारचा मुदतवाढीचा हा आदेश अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, ककृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. ' महाराष्ट्र शासनाच्या १९६८च्या कोषागार नियमानुसार निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी १ नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला दिनांक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकाऱ्यास दरवर्षी सादर करावा लागतो. सदर दाखला मुख्यत संबंधित निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात. त्या बँकेमार्फत संबंधित कोषागारात जमा करावा लागतो.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या