Ticker

6/recent/ticker-posts

“महिला तक्रार निवारण दिनाचे” आयोजन

 ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये “महिला तक्रार निवारण दिनाचे” आयोजन

दादासाहेब येंधे :

ठाणे पोलीस आयुक्‍तालयामधील पोलीस स्टेशन स्तरावर प्रत्येक शनिवारी “न 'महिला तक्रार निवारण दिनाचे'' आयोजन केले जाते. दिनांक २६/०९/२०२० रोजी मा. पोलीस आयुक्‍त, ठाणे श्री. विवेक फणसळकर यांचे मार्गदर्शनानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “महिला तक्रार निवारण दिन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कोव्हीड-१९ कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभुमी विचारात घेवून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणून आयुक्तालयातील परिमंडळ १ ते ५ मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या भरवसा सेल या विभागांमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या “ महिला तक्रार निवारण दिन”'या उपक्रमांमध्ये त्या-त्या परिसरातील महिला, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसचे एनजीओ पदाधिकारी / सदस्य, स्थानिक समाज सेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या एकुण ५०२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी एकुण ३८१७ तक्रारींमध्ये मार्गदर्शन व समुमदेशन करून तक्रारींचे निरकरण करण्यात आले असून उर्वरीत तक्रारींची कायदेशीर बाबींनुसार पुर्तता करून निराकरण करण्यात येणार असल्याबाबत संबंधीत महिला तक्रारदार यांना आशवासीत त करण्यात आले सदर उपक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून अशा प्रकारचे उपक्रम यापुढे देखील नियमीत राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले.

प्रस्तुत उपक्रम मा. पोलीस आयुक्‍त, ठाणे श्री. विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्‍्त,ठाणे डॉ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्‍त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण श्री. दत्ता कराळे, अपर पोलीस आयुक्‍त, पश्‍चिम प्रादेशिक विभाग, ठाणे श्री. अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्‍त, गुन्हे, ठाणे श्री. प्रविण पवार, यांचे मार्गदर्शनानुसार परिमंडळ १ ते ५ पोलीस उप आयुक्‍त, पोलीस उप आयुक्‍त, गुन्हे, विभागीय सहा. पोलीस आयुक्‍त, सहा. पोलीस आयुक्‍त, प्रतिबंध, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे उपरिथतीत पार पडला आहे.






टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या