कोरोनाग्रस्त रुग्णांना राज्य सरकारचा दिलासा; सिटी स्कॅनच्या दरांवर नियंत्रण
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारने सिटी स्कॅनच्या दरांवर नियंत्रण आणले आहे. यापुढे आता सिटी स्कॅनसाठी दोन ते तीन हजार रुपयांहून जाडा शुल्क आकारता येणार नाहीत, असे आदेश जरी करण्यात आले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून रोज कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतेक रुग्णांना छातीतील संसर्ग व न्यूमोनियासाठी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. सिटी स्कॅनसाठी रुग्णांना किमान साडेतीन ते सात हजार रुपये मोजावे लागतात. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच रुग्णांचेही अनेक आक्षेप होते. हि गोष्ट लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने एक समिती बनविण्यात आली होती. या समितीने सखोल अभ्यास करून सिटी स्कॅनसाठीचे दर निश्चित केले.
नवे दर : डॉ. शिंदे यांच्या समितीने १६ 'स्लाइस सिटी स्कॅन' साठी दोन हजार रुपये, १६ टी ६४ 'स्लाइस' क्षमतेच्या मशीनद्वारे केलेल्या सिटी स्कॅनसाठी अडिच हजार रुपये, तर ६४ 'स्लाइस'साठी तीन हजार रुपये दर निश्चित केला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आला.



0 टिप्पण्या