राज्य सरकारचा निर्णय - 'या' कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही
राज्य सरकारने 'मिशन बिगिन' अंतर्गत अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु केली आहे. काही शासकीय कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, आता दिव्यांग अधीकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हि सुविधा असणार आहे.


0 टिप्पण्या